इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : कसबा पेठेतील कागदीपुरा परिसरात आज पहाटे एका पञ्याच्या खोलीत आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून दोन वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित कारवाई करत आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
आग लागलेल्या घरातून दोन गॅस सिलेंडरमधून वायूगळती होत असल्याचे आढळले. अग्निशमन दलाने वेळीच सावधगिरी बाळगत हे सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले, ज्यामुळे मोठा संभाव्य धोका टळला.
प्राथमिक तपासात आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाकडून या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.