इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कवठे येमाईः शिरूर तालुक्यातील कवठेयेमाई ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मनीषा पांडुरंग भोर यांची गुरुवारी (दि. १७) बिनविरोध निवड करण्यात आली. मनिषाभोर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आनंद साजरा केला. भोर यांची वाद्याच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कवठेयेमाई ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती मुंजाळ यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत कवठे कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी मनिषा पांडुरंग भोर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मनिषा भोर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी ग्रामपंचायत कवठेयेमाई चे ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर भोर यांच्या समर्थकांनी भव्य मिरवणूक काढत मनिषा भोर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच मनिषा भोर यांनी दिली आहे.