Tuesday, June 3, 2025
Homeक्राईम न्यूजकर्वेनगर परिसरात झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

कर्वेनगर परिसरात झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील कर्वेनगर परिसरातील समर्थ पथावर झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. राहुल जोशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल जोशी हे सिंहगड रोड येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अचानक एक झाड त्यांच्या डोक्यावर कोसळले. मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे, ज्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. पाणी साचल्यामुळे अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पावसाळ्याआधी महापालिकेकडून कोसळण्याची शक्यता असलेली झाडं काढली गेली नाही. तसेच पावसाळ्याच्या तयारीसाठी पुरेशा उपाययोजना न केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात नागरिक तुंबलेले गटार आणि खड्डे ही प्रमुख चिंता असल्याचे सांगत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी घेण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी आणि या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पीएमसीने आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments