इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकवणारा चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खडकी पोलिसांनी केली. याप्रकरणी एका ६५ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिनेश अमृतलाल जैन (वय २४ वर्ष, रा. खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शांता प्रवीण साकरिया यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यातदार महिला २८ मे रोजी एल्फिन्स्टन रस्त्यावरून जात असताना आरोपी जैन हा फिर्यातदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका मारून घेऊन तिथून पळून गेला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी गुन्हे शोध पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सुपूर्द केला.
त्यानुसार शोध पथकाने सीसीटीव्ही चित्रण तपासून तसेच तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढला. याबरोबरच पोलिसांनी खबऱ्याच्या माध्यमातून चोरट्याच्या हालचालींची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ३१ मे रोजी आरोपी जैन ला अटक केली. तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, अंमलदार सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, संदेश निकाळजे, ऋषिकेश दिघे आणि प्रताप केदारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणातील आरोपी जैन चा आणखी इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता का? तसेच त्याला ही चोरी करण्यासाठी कोणी मदत केली. तसेच चोरी केलेल्या सोनसाखळीची विक्री त्याने कुठे केली. याचा तपासही पोलीसांकडून केला जात आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येवू शकतात, अशी माहिती तपासी अधिकारे उपनिरीक्षक चौगले यांनी दिली.