इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भिगवण : भिगवण यथून एक भाषण अपघाताचा बातमा समार आली आहे. ट्रकला पाठीमागून एसटीची जोरादार धडक बसून चौदा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हि घटना इंदापूर तालुक्यातील डाळज नं २ जवळ आज (दि.२९) ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
निलूबाई मांदुर्गे (वय-६५ लातूर), जखमी गोविंद मांडे (वय-३८ लातूर), नाजूक बीन (वय-७५ लातूर), रोहित मस्के (वय-२७ लातूर), राहुल त्यागी (वय-३५ दिल्ली), इब्राहिम शेख (वय- ८० लातूर), महादेव सूर्यवंशी (वय-७० उस्मानाबाद), रामराव सूर्यवंशी (वय- ७५ लातूर), माधव अभगे (वय-६५ लातूर), पार्वती अभगे (वय-६० लातूर), राजकुमार मस्के (वय-६५ लातूर), मानसी घोडगे (वय-११ लातूर), संगीता घोडघे (वय- ३२ लातूर) अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या पुढे ट्रक चालली होती. एसटी ही लातूर हुन पुण्याच्या दिशेने निघाली होती. ट्रकला पाठीमागून एसटीने जोरादार धडक दिली. या धडकेत १४ ते १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इंदापूरातील डाळज नंबर २ जवळ सोलापूर पुणे लेनवर मध्यरात्री झाला आहे.
एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पंडित महादेव सावंत (वय-४५ उस्मानाबाद) तसेच अपघातातील सर्व जखमी अवस्थेतील व्यक्तींना भिगवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा अॅम्बुलन्स चे मालक केतन वाघ यांनी तातडीने आपल्या अॅम्बुलन्स मधुन जखमी अपघातग्रस्त व्यक्तींना भिगवण येथील रुग्णालयात दाखल करण्याचे मोलाचे कार्य केले आहे.