Wednesday, July 2, 2025
Homeक्राईम न्यूजआधी टायर फुटला मग अचानक टोळीचा हल्ला; धाराशिवच्या रस्त्यावर घडलं अघटीत..

आधी टायर फुटला मग अचानक टोळीचा हल्ला; धाराशिवच्या रस्त्यावर घडलं अघटीत..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

छत्रपती संभाजीनगरः राज्यात गेल्या काही दिवसापासून खून, हाणामारी, चोरी, अत्याचार अशा गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अज्ञात टोळीने आडवून लूटमार केली आहे. या टोळ्यांनी आधी वाहनांचा टायर फोडलं आणि कार थांबवली त्यानंतर प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याकडून महागडा ऐवज लुटला. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते सहा जणांच्यां टोळीने सोलापूर -संभाजीनगर महामार्गावरील कावलदरा परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची चारचाकी अडवून प्रवाशांना मारहाण करत लूटलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडील सोने, मोबाईल आणि इतर वस्तू लुटून नेल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ज्या गाड्यांवर हल्ला झाला, त्या गाड्या धाराशिवसह बाहेरील जिल्ह्यातील आहेत. 5 ते 6 जणांच्या टोळीने ही लूट केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.. धावत्या वाहनासमोर काहीतरी टाकून टायर फोडण्यात आले. त्यानंतर वाहने थांबवुन लूट करण्यात आली. वाहनाची टायर फोडण्यात आल्याने अपघात होता होता वाचला.

रात्री अपरात्री वाहनांचं टायर फोडून गाडी रोखायची आणि अर्धवट झोपेत असलेल्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांची लूटमार करायची, आरोपींच्या या चोरी करण्याच्या पद्धतीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशाप्रकारे टायर फोडून वाहनांना थांबवलं जात असल्याने मोठा अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments