इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : आठवीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून मागील आठ दिवसांपासून चकवा देणाऱ्या रिक्षाचालकाला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) बाजार मैदानातून सोमवारी (ता.12) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
विजय वसंत जाधव (वय 24, रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी हि लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जात असते. दरम्यान, पिडीत मुलगी मंगळवारी (ता. 6 ऑगस्ट) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत मुलगी थांबली होती. तेव्हा तोंडओळखीचा रिक्षाचालक आरोपी विजय जाधव तेथे आला. व अल्पवयीन मुलीला म्हणाला चल तुला शाळेला सोडतो, असे सांगितले.
अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी विजय जाधव पिडीतेला म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला होता, तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे. असे खोटे सांगून मुलीला घरी घेऊन गेला. त्यानंतर पिडीतेसोबत लगट करून बळजबरी करू लागला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तवणूक करू लागला. मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी पिडीता जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांना आरोपी विजय जाधव हा कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बाजार मैदानात येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी विजय जाधव याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपी विजय जाधव याला खाक्या दाखविताच आरोपींने वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीची रिक्षाही जप्त केला आहे.
हि कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार योगेश कुंभार, संभाजी देवीकर, पोलीस नाईक तेजस जगदाळे व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली आहे