Wednesday, June 4, 2025
Homeक्राईम न्यूजअजित पवारांचा मास्टर स्ट्रोक..! राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदी 'या' दोन नेत्यांना...

अजित पवारांचा मास्टर स्ट्रोक..! राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदी ‘या’ दोन नेत्यांना संधी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दिपक मानकर यांनी 14 मे रोजी पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षातील 2 नेत्यांना संधी दिली आहे. यामध्ये माजी आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे आता पुणे शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नवीन शहराध्यक्ष असणार आहेत.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता शहरात पक्षाचा विस्तार व प्रभाव वाढवण्यासाठी दोन शहाराध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व-पुणे शहराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांना शहराच्या पश्चिम पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments