Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजअखेर मृत्यूशी झुंज संपली....! इंदापूर गोळीबारातील 'त्या' जखमी तरुणाचा मृत्यू; शिरसोडी गावात...

अखेर मृत्यूशी झुंज संपली….! इंदापूर गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू; शिरसोडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा ४ ऑक्टोंबर रोजी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राहुल अशोक चव्हाण असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नेमक प्रकरण काय?

पोलीसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन मागील सोमवारी (दि. ३०) सायंकाळी रात्री पावणेसात ते सात वाजण्याच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल चव्हाण याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. इंदापूर व अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी राहुलला पुण्यातल रुग्णालयात दाखल केले होते. शरीरात घुसलेल्या तीन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले होते. मात्र, मणक्यामध्ये घुसलेल्या एका गोळीमुळे मूत्रपिंडामध्ये संसर्ग झाला. त्यामुळे राहुलची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर संपली.

दरम्यान, ससूनमधील शवविच्छेदन झाल्यानंतर राहुलचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या मूळगावी आणण्यात येणार आहे. राहुल आणि आरोपी एकाच गावचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी गावात मोठं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलीसांनी अभिजित बाळकृष्ण चोरमले, क्षितिज बाळकृष्ण चोरमले, प्रकाश हंबीरराव शिंदे, धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले या चार आरोपींना अटक केली आहे. फरार असणा-या अशोक केरबा चोरमले, विश्वजित हनुमंत चोरमले, महेश रमेश शिंदे, ओम सोमनाथ ठवरे, सोमनाथ ठवरे (सर्व रा. शिरसोडी, ता. इंदापूर) यांचा शोध इंदापूर पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments