इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शनिवार संध्याकाळी पाच वाजता ताडीवाला रोड नदीपात्रात पडलेला राहुल सूर्यकांत हावडे (वय वर्ष अंदाजे 24) अखेर सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण पोहण्यासाठी नदी पत्रात गेला असता बुडाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर येरवडा अग्निशमन दलाने तरुणाचा शोध सुरु केला होता.
गेल्या तीन दिवसांपासून या तरुणाचा शोध सुरु होता. या तरुणाचा शोध नायडू अग्निशमन केंद्र येरवडा, अग्निशमन केंद्र खराडी, बी टी कवडे अग्निशमन केंद्रातील सर्व फायर गाड्या घेत होत्या.
तीन दिवस ताडीवाला रोड ते मांजरी बंधारा पर्यंत ही शोध मोहीम रांत्रदिवस सुरु होती. विजय भिलारे साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबवण्यात आली.
तीन दिवस अहोरात्र प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमन दलाला यश आले. सदर व्यक्ती ही मुंडवा ब्रिजच्या खाली आज सायंकाळी पाच वाजता पाण्यावरती वाहत चालली होती. यांनतर सदर व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.