Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज २०१४ च्या किमतीत मिळतोय LPG सिलिंडर, ९ वर्षांपूर्वी किती होता दर? जाणून...

२०१४ च्या किमतीत मिळतोय LPG सिलिंडर, ९ वर्षांपूर्वी किती होता दर? जाणून घ्या…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

LPG Price 2014 Vs 2023: केंद्र सरकारनं देशवासीयांना रक्षाबंधनापूर्वी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर देशात १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. दरम्यान, विना अनुदानीत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती आता सप्टेंबर २०१४ च्या किंमतीवर आल्या आहेत..

इंडियन ऑईलनुसार १ सप्टेंबर २०१४ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीत ९०१ रुपये, कोलकात्यात ९४५ रुपये, मुंबई ९२६.५ रुपये आणि चेन्नईत ९०२.५० रुपये होते. आता सप्टेंबर २०२३ मध्ये म्हणजेच तब्बल ९ वर्षांनंतर दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये चेन्नईत ९१८.५० रुपये झाली आहे.

दरम्यान, सरकारनं घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठ्या कपातीची घोषणा केली होती आणि ३० ऑगस्ट पासून सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यावर २०० रुपयांचं अनुदानही सरकारनं दिलंय. त्यांच्यासाठी सिलिंडरची किंमत ४०० रुपयांनी स्वस्त झालाय. या कपातीनंतर १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही १५८ रुपयांनी कमी करण्यात आली होती. गेल्या महिन्यातही यामध्ये ९९.७५ रुपयांची कपात करण्यात आलेली.

३५ कोटी कुटुंबांना फायदायासोबत सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ७५ लाख नवे मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे. यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या १०.३५ कोटी होईल. गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपातीचा फायदा ३५ कोटी कुटुंबीयांना होणार आहे. या कपातीसाठी सरकार अनुदान देत आहे, म्हणजेच प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांची रक्कम सरकार पेट्रोलियम कंपन्यांच्या खात्यात टाकणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी साधली

येत्या वर्षात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वीच सरकारनं संधी साधली आहे. गॅसच्या किंमतीत कपात करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. विरोधकांनीही गॅस सिलिंडरच्या किंमतीवरुन सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री स्मृती ईराणी यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवणही करुन दिली होती. निवडणुकीच्या वर्षातच आता सरकारनं संधी साधली आहे.

RELATED ARTICLES

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

Recent Comments