Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजहॉटेल व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने 43 लाखांची फसवणूकः लष्कर...

हॉटेल व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने 43 लाखांची फसवणूकः लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हॉटेल व्यवसायिकास शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ४३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका हॉटेल व्यावसायिकाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हॉटेल व्यावसायिक लष्कर भागात राहण्यास आहे. सायबर चोरट्यांनी हॉटेल व्यावसायिकाला मोबाईलवर माहितीचा मेसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी व्यावसायिकाला दाखविले होते. चोरट्यांनी व्यावसायिकाला एक लिंक पाठवून व्हॉटसअप समुहात घेतले. संबधित समुहात सहभागी झाल्यानंतर चोरट्यांनी व्यावसायिकाला इतरांना मिळणारे लाभ पाहून आमिष दाखवून पैसे भरण्यास सांगितले. व्यावसायिकाने वेळोवेळी आरोपींच्या खात्यात ४८ लाख रुपये जमा केले. आरोपींनी त्यांना पाच लाख रुपये परताव्यापोटी दिले.

परतावा मिळाल्यानंतर व्यावसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. त्यांना कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक एस पवार पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments