Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजहॉटेल मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने डोक्यात केले वार; पिंपरखेड येथील प्रकार

हॉटेल मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने डोक्यात केले वार; पिंपरखेड येथील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती: पिंपरखेड (ता. शिरूर) येथील हॉटेलविसावाच्या मॅनेजरने एक लाख रुपये दिले नाही, म्हणून धारदार कोयत्याने मॅनेजरच्या डोक्यात हातावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड गावच्या हद्दीतील विसावा हॉटेल येथे घडली.

याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हरेश ठकाजी चोरे (वय- 45 वर्ष, हॉटेल मॅनेजर, रा. जांबुत, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रशांत सारंगकर शिरसाठ (रा. ढोमेमळा, पिंपरखेड ता. शिरुर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपरखेड गावच्या हद्दीतील विसावा हॉटेल बिअर बार याठिकाणी प्रशांत शिरसाठ याने हॉटेल मॅनेजरकडे एक लाख रुपये मागीतले. मात्र, हॉटेल मॅनेजर हरेश चोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे शिरसाठने हॉटेल मॅनेजर हरेशला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने डाव्या हाताच्या कोपऱ्यावर व डोक्यात वार केले.

याबाबत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments