इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
धाराशिवः धाराशिव मधून एक बातमी समोर आली आहे. ‘नाद करतो काय?.. यायलाच लागतंय..’ म्हणत समाजमाध्यवर व्हायरल झालेल्या भाग्यश्री हॉटेलची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. मात्र या हॉटेल वर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हॉटेल मालकावर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. रविवारी (८ जून) ला अचानक दगडफेक झाली. हॉटेल बंद असताना समाजकंटकांनी दगडफेक करून मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे हॉटेल मालक संतप्त झाला आहे.
जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलवर जेवण्यासाठी राज्यभरातून रांगाच्या रांगा लागतात. येथे दिवसभरात ११ ते १२ बोकडं कापले जातात. या हॉटेल ला इतक्या मोठ्या प्रमाणात मटण खवय्यांनाकडून प्रतिसाद मिळत असल्यामुळे हॉटेलवर मोठी गर्दी जमत आहे. पण आता या हॉटेलवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आज सोमवार (९ जुन) रोजी हॉटेल मालक नागेश मडके यांनी या घटनेबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले ‘हॉटेल भाग्यश्री… आज ९ तारीख. काल हॉटेल बंद होतं. आज उघडणार होतो, पण रात्री दगडफेक झाल्याने बॅनरची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये बोर्डचं नुकसान केलं आहे. त्यामुळे हॉटेल बंद ठेवावं लागलंय. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस पुढील कारवाई करतील, अशी माहिती हॉटेल मालक मडके यांनी दिली.