Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजहृदयद्रावक..! टँकरच्या चाकाखाली सापडून एका वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू: हडपसर परिसरातील घटना

हृदयद्रावक..! टँकरच्या चाकाखाली सापडून एका वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू: हडपसर परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. टँकरच्या चाकाखाली येऊन एक वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या चिमूकल्याचे नाव आहे. याप्रकरणी बबीतादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादिवरून हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरच्या चाकाखाली येऊन एक वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या चिमूकल्याचे नाव आहे. महतो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची भागातील एका भंगाराच्या दुकानात कामाला आहेत. तिथेच ते वास्तव्यास आहेत.

अधिक माहिती अशी की, मंगळवारी (२१ जानेवारी) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महातो यांचा एक वर्षांचा मुलगा कृष्णा भंगार माल दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबीतादेवी यांनी त्याला चटईवर खेळायला ठेवले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर टँकर चालक तेथून पसार झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments