Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजहुंड्यासाठी छळ...! विवाहितेनी उचललं टोकाचं पाऊल; घटनेने खळबळ

हुंड्यासाठी छळ…! विवाहितेनी उचललं टोकाचं पाऊल; घटनेने खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपळे सौदागर परिसरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “तुझ्या घरच्यांनी लग्नात हुंडा दिला नाही” या कारणावरून प्रत्येकवेळी विवाहितेचा छळ करण्यात आला. याच छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काजल रवींद्र वाघमारे (वय-22, रा. पिंपळे सौदागर) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

ही घटना 23 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झिंजुळे मळा, परिसरातील पिंपळे सौदागर येथे घडली. हा प्रकार 1 जानेवारी 2022 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यातील माटेगडी आणि पिंपळे सौदागर येथे घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी तिची आई जिजाबाई परमेश्वर कांबळे (वय-43, रा. बाभळगाव, ता. जि. लातूर) यांनी २६ ऑगस्ट रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून, रविंद्र गोपाळ वाघमारे, बेबन गोपाळ वाघमारे आणि गोपाळ वाघमारे सर्व (रा. माटेगडी, ता. निलंगा, जि. लातुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जिजाबाई यांची मृत मुलगी काजल वाघमारे हिला तिचा पती रविंद्र, सासु बेबन तसेच सासरे गोपाळ यांनी आपसांत सर्वांच्या संमतीने घरगुती कारणावरुन तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ तसेच दमदाटी करुन तिचा मानसिक आणि शारिरीक त्रास दिला. दरम्यान, काजल हिला लग्नामध्ये हुंडा दिला नाही आणि तू कामाला देखील जात नाही म्हणून तिचा वारंवार छळ करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या मानसिक छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments