इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. आता अभिनेत्री आता देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी राशा थडानी प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. राशा हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, पण तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
राशा आता अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर राशा कायम सक्रिय असते. राशा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
एवढंच नाही तर, राशा आई रवीना टंडन हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. चाहते दोघींच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी, अजय देवगण याचा भाचा अमन देवगण याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा आणि अमन यांच्या जोडीला ‘काय पो चे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर लॉन्च करणार आहेत…