इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात एका टोळक्याने दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोळक्याने हातात कोयता घेऊन पानमळा परिसरातील गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी आनंद शाहू चव्हाण (वय ३४, रा. शिवमल्हार सोसायटी. कोंढवा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानंतर टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळक्याने हातात कोयता घेऊन सिंहगड पानमळा परिसरातील गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. या भागात टोळक्याने शिवीगाळ करून दहशत निर्माण केली, तसेच कोयते उगारुन वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी भागातील घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे करत आहेत.