Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी पळविलीः दोन माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलिसांची 'एमपीडीए' कारवाई

हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी पळविलीः दोन माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलिसांची ‘एमपीडीए’ कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मंदिरात ५०० रुपये दान करायचे असून नोटेवर घासण्यासाठी सोन्याची अंगठी काढायला सांगून जेष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नामदेव गोविंदा पोकळे (वय-७०, रा. गणेशनगर, धायरी, पुणे) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गणेशनगर वडगाव धायरी भागात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी नामदेव पोकळे हे थांबले असताना चोरटे तिथे आले आणि चुलते वारले असून त्यांना दत्त मंदिरात दान करायचे आहे इथे कुठे दत्त मंदिर आहे का अशी विचारणा केली. यानंतर चोरटयांनी त्यांच्या जवळील ५०० ची नोट दाखवून त्या नोटेवर घासनेसाठी फिर्यादी यांच्या बोटातली सोन्याची अंगठी काढायला भाग पाडली. यानंतर अंगठी नोटेवर घासून अंगठी नोटेवर ठेऊन नोटीची घडी मंदिरात दान करा असे सांगून नोटेत अंगठी न ठेवता दगडाचा खडा ठेऊन फिर्यादी यांची ९० हजारांची २० ग्रॅम सोन्याची अंगठी चोरल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस निंबाळकर करत आहेत.

गुंडाविरुद्ध पोलिसांची ‘एमपीडीए’ कारवाई

पुणे शहरात येरवडा भागात दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत शहरातील ९८ गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्तांनी कारवाई करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. येरवडा भागात दहशत माजविणाऱ्या शाहरुख सईद खान (वय २७, रा. नागपुर चाळ, येरवडा) याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. खानविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली. खान याला वर्षभरासाठी चंद्रपूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments