Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजहडपसर भागात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच; कोयते फिरवत वाहनांची तोडफोड

हडपसर भागात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच; कोयते फिरवत वाहनांची तोडफोड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : हडपसर परिसरात टोळक्याकडून दहशत पसरविण्याचे प्रकार सुरूच आहेत. कोयता गँगने संकेत विहार सोसायटी परिसरात कोयते फिरवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी संकेत विहार सोसायटी परिसरात घडली. याप्रकरणी चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारुती तात्यासाहेब काळोखे (वय-३१, रा. दिव्याश्रय सोसायटी, संकेत विहार, फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फुरसुंगी येथील संकेत विहार सोसायटी परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोळके आले. त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. टोळक्याने कोयते उगारून वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार काळोखे यांनी पाहिला. त्यांनी तोडफोड करणाऱ्या आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी काळोखे यांच्यावर कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून हडपसर भागात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरु आहेत. महिनाभरापूर्वी कोयता गँगच्या टोळक्याने या भागातील दुकानदारांना धमकावून तोडफोड केली होती. या घटनांमुळे नागरिकामधे भीतीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments