Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजहडपसर पोलिसांकडून चोरट्याला अटकः तर अल्पवयीन ताब्यात; दोन दुचाकीसह एक रिक्षा ...

हडपसर पोलिसांकडून चोरट्याला अटकः तर अल्पवयीन ताब्यात; दोन दुचाकीसह एक रिक्षा जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दुचाकीसह रिक्षा चोरणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी आणि एक रिक्षा असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला. चोरट्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दिलीप शिवराज म्हेत्रे (वय २४ रा. गल्ली नंबर ११ संकेत विहार काळेपडळ हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वाहन चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे आणि अंमलदार सुशील लोणकर यांनी तपासाला गती दिली. त्यानुसार दिलीप म्हेत्रे याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्यांनी दोन दुचाकी आणि रिक्षा चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त आर राजा, एसीपी अश्विनी राख, वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, एपीआय अर्जुन कुदळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, सचिन जाधव, अनिरूध्द सोनवणे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments