Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजहडपसर परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना...

हडपसर परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर, (पुणे) : टँकरद्वारे पाणी वाटप करीत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून टोळक्याने हडपसरजवळील काळेपडळ परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.24) घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेम सुरेश सुरवसे (वय-18), रोहन समिंदर कांबळे (वय-18, दोघेही रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर, पुणे), चैतन्य संपती सुर्यवंशी (वय -18), रोहित शहाजी सुतार (वय-18), प्रभाकर उर्फ राध्या सोमनाथ तोटे (वय-18, तिघेही रा. रेल्वेगेट म्हसोबा मंदिराजवळ काळेपडळ, हडपसर, पुणे) व आदित्य हनुमंत मोहोळकर (वय-18, रा. जोगेश्वर कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल बाळासाहेब लोंढे (वय-19, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र उमेश ससाणे हे सय्यदनगर, काळेपडळ, हडपसर परिसरात टँकरद्वारे पाणी वाटप करीत होते. उमेश ससाणे यांच्या ताब्यातील टँकरचा आरोपी चैतन्य सुर्यवंशी व आदित्य मोहोळकर याला धक्का लागला. या वादातून आरोपींनी प्रगती शाळेच्या मैदानाच्या बाजूला सासानेनगर येथे दगड व हत्यारांच्या साहाय्याने सदर परिसरात पार्क केलेल्या कार, टेम्पो, रिक्षा, अशा एकूण 15 ते 20 वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकाने घटनास्थळाच्या आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या आरोपींचे नावे निष्पन्न केली. तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी प्रेम सुरवसे व रोहन कांबळे या दोघांना हडपसर भागातून अटक केली व एका विधिसंघर्शित बालकास ताब्यात घेतले.

दरम्यान, गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून 4 फरार झालेले होते. पोलिसांनी त्यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवून आरोपी चैतन्य सुर्यवंशी, रोहित सुतार, प्रभाकर उर्फ राध्या तोटे व आदित्य मोहोळकर यांना फुरसुंगी येथून रविवारी (ता.26) अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन व हत्यारे जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

सदरची कामगीरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजितवाड, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे व अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments