Saturday, January 11, 2025
Homeक्राईम न्यूजहडपसर परिसरात मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

हडपसर परिसरात मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसांशी वाद घालत मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली आहे. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. याप्रकरणी रात्री उशीरा तरुणाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी शनिवारी सायंकाळी मगरपट्टा परिसरातील रासकर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेथे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाने त्याला हटकले.

दरम्यान, पोलिसाने हटकल्याने तरुणाने वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments