इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील तीन मजली इमारतीला काही वेळापूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.