Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजहगवणे पिता-पुत्राला आश्रय देणाऱ्या पाचही आरोपींना जामीन

हगवणे पिता-पुत्राला आश्रय देणाऱ्या पाचही आरोपींना जामीन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पसार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून बावधन पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना पुणे न्यायालयाने कोठडी देऊन जामीन मंजूर केला आहे.

हगवणेंना आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) याच्यासह मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांना मंगळवारी दुपारी शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी त्यांना मंगळवारी जामीन मंजूर केला.

दरम्यान गुन्हेगाराला आश्रय देणे हा जामीनपात्र गुन्हा असतानाही आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी कोणत्या आधारावर केली. पोलिसांना फक्त अटकेचे अधिकार आहेत का, सरकार पक्षाने जागरूकता दाखवायला नको का,’ अशा कठोर शब्दांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी बावधन पोलिसांवर ताशेरेही ओढले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments