Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजस्वारगेट, हडपसर भागातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्वारगेट, हडपसर भागातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरातील स्वारगेट आणि हडपसर भागातील फुरसुंगी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वारगेट परिसरातील सारसनगर सोसायटीजवळ पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आयाज अफगाण शेख (वय-४०), गणेश भाऊसाहेब भोसले (वय-४८, दोघे रा. मंगळवार पेठ), वसीम फारुख शेख (वय-४०, रा. कांतीपुरम सोसायटी, कसबा पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, हडपसर भागतील फुरसुंगीमध्ये पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी साईनाथ बाळासाहेब हरपळे (वय-३२, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), लखन तानाजी कासले (वय-२६, रा. भेकराईनगर फुरसुंगी) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments