इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये २६ वर्षांच्या एका तरुणीवर सराईत गुन्हेगाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२६ फेब्रुवारी) मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे. पीडित तरुणीने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. दत्तात्रय गाडे (वय ३६) असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तरुणी पुण्यात परिचारिकेचं काम करते. ती फलटनला आपल्या गावी जात होती. तेंव्हा गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते. आता या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये गुन्हेगार दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीवर एकदाच नाही तर दोनवेळा बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीने फलटणला आपल्या गावी चालली होती. मात्र स्वारगेट बस डेपोत नराधम आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली होती. तक्रारीनंतर पोलिसांची आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होते.
दरम्यान, पीडित २६ वर्षीय तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. पीडित तरुणीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल बुधवारी (२६ फेब्रुवारी) संध्याकाळी ससून रुग्णालयाने पोलिसांना दिला आहे. यामध्ये आरोपीने पिडीतेवर एकदा नव्हे तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर स्वारगेट एसटी डेपोतील सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी स्वारगेटमधील २३ सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात वारंवार खून, मारामाऱ्या, कोयता गँगची दहशत आणि आता बलात्कार अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणी नागरिकांकडून संतापव्यक्त केला जात आहे.