इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सध्या दत्ता गाडे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आहेत. नराधम आरोपी पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत दत्ता गाडे याचा पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर, तसेच शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचे आढळले आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने पोलिसांचा गणवेश परिधान करून आणखी काही गुन्हे केले आहेत का या दृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.
दत्ता गाडे हा एसटी बसस्थानक आगारात पोलीस असल्याचं भासवून लोकांना लुटायचा. पुणे ग्रामीण आणि शहर पोलीस दलात बनावट पोलीस म्हणून वावरायचा अशी धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. दत्ता गाडे याला 2024 मध्ये स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या पुण्यात अटक देखील केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईल मध्ये पोलीस वेशातील फोटो आढळला होता. त्यानंतर आता सुरू असलेल्या चौकशीत ही पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे.