Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजस्वारगेट घटनेनंतर शिवशाहीत पुन्हा धक्कादायक प्रकार ; 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग, नराधमाला...

स्वारगेट घटनेनंतर शिवशाहीत पुन्हा धक्कादायक प्रकार ; 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शिवशाही बसमध्ये 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे ते सांगली अशा शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीचा बसमधील प्रवास करणाऱ्या तरुणांने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावामध्ये राहणारी २४ वर्षीय तरूणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने राहत आहे. ही पीडित तरुणी काल स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी येत होती. यावेळी इस्लामपूर जवळ संशयित वैभव कांबळे हा बसमध्ये चढला. त्याने खिडकी जवळून तसेच सीटच्यामधून हात काढून तिला स्पर्श करत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बस सांगली स्थानकात आल्यावर तिने हा घडलेला प्रकार माहिती चालक आणि पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयितास पकडले, चोपत त्याला पोलिस ठाण्यात आणले. यावेळी डायल ११२ आणि गस्ती पथक तत्काळ दाखल झाले होते. पीडितेने याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यानंतर पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे (वय ३४ रा. दुधारी मारुती मंदिर जवळ, वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. शिवशाही बस मध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पिडीतेचे चारित्र्यहनन करणाऱ्या खोट्या, अवमानजनक, असंवेदनशील व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर बंदी घालावी असा पिडीतेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी फेटाळला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या स्वारगेट घटनेनंतर शिवशाही बसमध्ये पुन्हा एकदा तरुणी सोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर बसमध्ये ही महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments