Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजस्वर्गात जागा देण्याच्या आमिषाने डॉक्टरला पाच कोटी रुपयांनी गंडवले

स्वर्गात जागा देण्याच्या आमिषाने डॉक्टरला पाच कोटी रुपयांनी गंडवले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पत्नीशी सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून हा तोडगा यशस्वी झाल्यास स्वर्गप्राप्ती होईल अशी बतावणी करून कोंढवा परिसरात एका डॉक्टरची तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यास्मिन सादिक शेख, सादिक अब्दुलमजीद शेख, अम्मार सादिक शेख, एहतेशाम सादिक शेख, राज आढाव ऊर्फ नरसू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि अपहार केल्याची कलमे लावण्यात आली आहे. या प्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक झालेले डॉक्टर कोंढव्यातील एनआयबीएम मार्गावर राहतात.

फिर्यादीचा पत्नीसोबत वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदर हे डॉक्टर आहेत. ते या पूर्वी सौदी अरेबियात राहत होते. तब्बल ३० वर्ष त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला आहे. त्यांची तीन लग्न झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात कोंढव्यात वास्तव्यास त्यांच्या पत्नी सोबत राहायला आहे. मात्र, दोघांमध्ये वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर हे एका प्रार्थनास्थळात गेले असतांना त्यांची व आरोपींशी ओळख झाली. फिर्यादी यांनी त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे वाद होत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी उपाय मागितले.

त्यानंतर आरोपींनी त्यांचा कौटुंबिक वाद धार्मिक तोडग्याने सोडवण्याचे आमिष दाखवले.

पाच कोटी रुपयांची केली फसवणूक

हा वाद मिटल्यास त्यांना स्वर्गप्राप्ती होईल अशी बतावणी देखील त्यांनी केले. या साठी फिर्यादीकडून त्यांनी वेळोवेळी पैसे घेतले. तब्बल ५ कोटी रुपये त्यांनी उकळले. मात्र, त्यांचे वाद कमी झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी आरोपींना जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. यानंतर फिर्यादी यांनी कोंढवा पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करत आहेत. या घटनेमुळे पोलिस देखील चक्रावले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments