इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील कोथरूडमध्ये रविवारी मध्य रात्री एक विचित्र घटना घडली आहे. येथे एका नृत्य महोत्सवात लपूनछपून व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगेश जवाहिरे (वय 35) असे व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, कोथरूडमधल्या एका लॉन्सवर नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथे गर्दीचा फायदा घेत मंगेश याने पुरुषांच्या स्वच्छतागृहामध्ये कॅमेरा लपून लावला. स्वच्छतागृहात लघवी करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ त्याद्वारे रेकॉर्ड करत होता. या बाबत काही लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून चांगला चोप दिला. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
याबाबत लॉन्सच्या एका 48 वर्षीय कामगाराने पोलिसांमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीनंतर पोलिसांनी मंगेशवर गुन्हा दाखल केला आहे.