इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन : आपल्या वैयक्तिक खर्चातूनगावातील महिलांना कायमस्वरूपी मोफत सॅनिटरी पॅड पुरवण्याचा संकल्प तरडे (ता. हवेली) येथील सरपंच अभिषेक दाभाडे यांनी केला ग्रामीण भागात मासिक पाळी संबंधित स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने सरपंच अभिषेक दाभाडे यांनी महिलांच्या
उरुळी कांचन : आपल्या वैयक्तिक खर्चातून गावातील महिलांना कायमस्वरूपी मोफत सॅनिटरी पॅड पुरवण्याचा संकल्प तरडे (ता. हवेली) येथील सरपंच अभिषेक दाभाडे यांनी केला आहे. ग्रामीण भागात मासिक पाळी संबंधित स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने सरपंच अभिषेक दाभाडे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी सरपंच अभिषेक दाभाडे यांनी ही घोषणा केली. यावेळी बाजार समितीचे संचालक लक्ष्मण केसकर, खरेदी विक्री संघाचे संचालक वसंत जगताप, माजी सरपंच शरद जगताप, भिकाजी गाढवे, माजी उपसरपंच माऊली काळे, अंकुश कोतवाल, दामोदर गाढवे, सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र जगताप, बापू बनकर, बाळासाहेब मेमाणे, पोलीस पाटील समीर जाधव, पंकज जगताप, अनिल जगताप, काळूराम कुरकुंडे, प्रविण गवते, मयुर गवते, नवनाथ गडदे संतोष गवते, आदि मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बोलताना सरपंच अभिषेक दाभाडे म्हणाले, “हा उपक्रम राबवण्यासाठी लवकरच गावातील शाळा आणि महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरेही आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी असे निर्णय घेतल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. असेही सरपंच अभिषेक दाभाडे यांनी सांगितले.”