Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज स्पार्कल कँडल' कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : ‘स्पार्कल कँडल’ बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तळवडे येथील ज्योतीबानगर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत सहा महिलांचा मृत्यू तर तर दहा जण जखमी झाले.

शरद सुतार (वय ४०), नजीर अमीर शिकलगार (रा. संतोषी मातानगर, मोहननगर, चिंचवड) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगर येथे राणा फॅब्रिकेशन कंपनीच्या आतील बाजूस शिवारज एंटरप्रायजेस कंपनी होती, वाढदिवसाच्या केकसाठीचे ‘स्पार्कल कँडल’ बनविण्याचे काम या कंपनीत केले जात होते. त्यासाठी स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थाचा वापर बेकायदेशीर व विनापरवाना केला. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कामगारांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही शरद सुतार, नजीर शिकलगार आणि दोन महिला यांनी शिवराज एंटरप्रायजेस ही कंपनी बेकायदेशीर विनापरवाना चालू ठेवून कंपनीतील सहा कामगारांच्चुज्ञ मृत्यूस तसेच १० कामगारांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी भादंवि कलम ३०४(२), २८५, २८६, ३३७, ३३८ सह द एक्सप्लोजिव्ह अॅक्ट १८८४ कलम ५,९ (बी) अन्वये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याप्रकरणी नजीर अमीर शिकलगार याला पोलिसांनी अटक केली. देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत.

आगीचे कारण अस्पष्टच…

शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत ‘स्पार्कल कँडल’ या शोभेच्या फटाक्यांना आग लागून मोठा स्फोट झाला. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments