Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने गळफास घेत केली आत्महत्याः तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने गळफास घेत केली आत्महत्याः तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा मिळाल्याने संशयास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने राहत्या हॉस्टेलवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार पेठेत घडली असून, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे उघडकीस आल्याने खडक पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. अभिलाषा मित्तल (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा मित्तल ही तरूणी मूळची वाशिमची होती. मागील महिन्यात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. गुरुवार पेठेतील मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. सोमवारी सकाळी अभिलाषा खोलीमध्ये एकटीच होती. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. काहीवेळाने तिच्या मैत्रिणीने दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला, दरवाजा उघडला नाही. तिने खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला. तिच्या अंगावर मारहाणीच्या काही खुणा आढळून आल्याने पोलिसांकडून बारकाईने तपास केला जात आहे. मुलीच्या पालकांनी या प्रकरणात सखोल तपास करून तिच्या अंगावर नेमक्या खुणा कशामुळे सापडल्या याबाबतची खातरजमा करावी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments