Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजस्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तल आत्महत्या प्रकरणः हॉस्टेल चालकास अटक; शिवीगाळ...

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तल आत्महत्या प्रकरणः हॉस्टेल चालकास अटक; शिवीगाळ करून केली मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला शिवीगाळ करून मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी हॉस्टेल चालकाला अटक करण्यात आली आहे. अभिलाषा महेंद्र मित्तल (वय-२७, मूळ रा. चंद्रकला निवास नाथबाबा गल्ली जालना) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र मांगीलाल मित्तल (वय- ५१, रा. जालना) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार हॉस्टेल चालक सुनील परमेश्वर महानोर (रा, शुक्रवार पेठ, मूळ रा. शेरेवाडी, पो. लोणी, रा. शिरूर कासार, जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटे ७ वाजून १५ मिनिट या दरम्यानच्या काळात गुरुवार पेठ येथील फॉर्च्यून लिव्हिंग गर्ल्स हॉस्टेल येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महेंद्र मित्तल यांची मुलगी अभिलाषा मित्तल ही आरोपी सुनील महानोर चालवत असलेल्या फॉर्च्यून लिव्हिंग हॉस्टेल मध्ये मागच्या तीन महिन्यापासून राहायला होती. घटनेच्या दिवशी हॉस्टेल चालक सुनील महानोर आणि अभिलाषा यांच्या डिपॉजिट वरून वाद झाले होते. यानंतर आरोपी सुनील माहानोर याने अभिलाषाला शिवीगाळ करत मारहाण केली होती.

या त्रासाला कंटाळून अभिलाषाने ती राहत असलेल्या हॉस्टेल मध्ये बेडशीटच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुनील महानोर याच्यावर भादंवि ३०६, ३२३ प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments