Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजस्टील विक्रेत्या पिता-पुत्राकडून कंपनीची 2 कोटींची फसवणूकः मुंढवा पोलिस ठाण्यात दोघांवर...

स्टील विक्रेत्या पिता-पुत्राकडून कंपनीची 2 कोटींची फसवणूकः मुंढवा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे स्टील पुरविण्याच्या अमिशाने पिता पुत्राने एका कंपनीची 2 कोटी 97 लाख 214 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्रीधर मोहन दुमाळे (वय-50, रा. रायकर पार्क, सिंहगड रस्ता) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार छगनलाल गुलाबचंद गुंदेशा (वय-६०), नीरज छगनलाल गुंदेशा (वय-३१ रा. दोघेही शानदर्शन बिल्डिंग, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. ही घटना ऑक्टोबर २०२२ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी श्रीधर दुमाळे हे कोरेगाव पार्क हाय स्ट्रीट प्रॉपर्टीज प्रायव्हेट या कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस आहे. कोरेगाव पार्क हाय स्ट्रीट प्रॉपर्टीज प्रायव्हेट या कंपनीच्या वतीने घोरपडी गाव येथे २०१९ पासून बांधकाम सुरु आहे. २०२२ मध्ये आरोपी छगनलाल आणि नीरज गुंदेशा यांनी फिर्यादी दुमाळे यांच्या कंपनीतील इतर कर्मचारी मुकेश बंबोली आणि आशिष मांढरे यांची भेट घेऊन कन्स्ट्रक्शनसाठी मागणी प्रमाणे लागणारे स्टील पुरवण्यात येईल असे सांगितले.

यावेळी बंबोली आणि मांढरे यांनी कन्स्ट्रक्शनसाठी कुठल्या स्टीलची गरज आहे पाहून तुम्हाला सांगतो असे सांगितले होते. यावेळी आरोपींनी ऑर्डर देण्यापूर्वी सर्व रक्कम आगाऊ द्यावी लागेल असे सांगितले होते. बंबोली आणि मांढरे यांनी याला विरोध करत ऑर्डर मिळाल्यानंतर पैसे देण्यात येतील असे सांगितले होते. मात्र आरोपी गुंदेशा पिता पुत्राने सांगितले की, यापूर्वी तुमच्या कंपनीला स्टील पुरवले आहे. त्यावेळी कुठलीही फसवणूक केली नाही. मात्र सध्या भांडवल कमी असल्याने ऑर्डर मिळण्यापूर्वी पैसे देण्यात यावेत.

यानंतर १० ऑक्टोबर २०२२ रोजी छगनलाल आणि नीरज गुंदेशा यांना कंपनीच्या कार्यालयात बोलवून स्टीलची ऑर्डर दिली. तर ३१ जानेवारी २०२३ रोजी गुंदेशाच्या बँक खात्यावर २ कोटी ९७ हजार २१४ रुपये पाठवले. यानंतर वेळोवेळी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने छगनलाल आणि नीरज गुंदेशा यांना स्टील पाठवण्यासाठी सांगण्यात आले. मात्र आरोपींनी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने आरोपी विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments