Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजस्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर घुसला दुकानात; एक महिला ठार, तर तीन...

स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर घुसला दुकानात; एक महिला ठार, तर तीन शाळकरी मुले जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वडगाव मावळ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे, तर तीन शाळकरी विद्यार्थ्यांसह एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

लता रणजित जाधव (वय 41 रा. कुडे वाडा, वडगाव मावळ) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सृष्टी राजेंद्र भाटेकर (वय-15 रा. केशवनगर, वडगाव नगरपंचायत) मृदुल संतोष भवार (वय-14) मैत्रिय संतोष भवार (वय-11) व संदीप पिरणसिंह झालटे (वय-40) तिघे (रा. दिग्विजय कॉलनी, वडगाव नगरपंचायत) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव टेल्को कॉलनीकडे जाणाऱ्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. मातोश्री हॉस्पिटल येथील स्टॉपवर सकाळी अनेक पालक मुलांना स्कूलबसमध्ये सोडवण्यासाठी आले होते. त्यावेळी स्कूलबसने अचानक तेथे थांबा घेतला. त्यावेळी पाठीमागून आलेला कंटेनर मात्र अनियंत्रित झाला आणि स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात तो थेट दुकानात घुसाला.

यावेळी तिथे असणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाला त्याची धडक बसली. या अपघातात एक महिला जागेवरच ठार झाली, तर तीन शाळकरी मुलांसह एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. वडगाव मावळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments