Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजस्किझोफ्रेनियाग्रस्त आईची चिमुकल्यासह ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; वाकड येथील घटना

स्किझोफ्रेनियाग्रस्त आईची चिमुकल्यासह ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; वाकड येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात वाकड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या ४ वर्षांच्या मुलासह ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना वाकड येथील रीगालिया या उच्चभ्रू सोसायटीत शनिवारी सकाळच्या ८.३० च्या सुमारास घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कोमल जगदीश हरिश्चंद्र (वय ३२, रा. रिगालिया, सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल यांनी इमारतीमधून उडी मारताना त्यांच्या आपला चार वर्षांचा मुलगा विहान याला कडेवर घेऊन उडी मारली. या घटनेत दोघांचाही जागेरच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोमल या स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर परदेशात आणि भारतात उपचार सुरू होते. मात्र, त्या यातून बऱ्या होत नव्हत्या. या प्रकारानंतर त्यांचे कुटुंबीय व शेजारी हादरले आहेत. याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments