Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजसोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार; बिबवेवाडी परिसरातील घटना

सोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार; बिबवेवाडी परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात सोसायटीसमोर गोंधळ घालताना हटकल्याने दोघांनी सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री झोपेत असताना दोन तरुणांनी सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. ०६) रात्रीच्या सुमारास रम्यनगरी सोसायटीच्या परिसरात घडली. या प्रकारानंतर दोघेही त्या ठिकाणाहून पसार झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फरार आरोपीना अटक केली आहे. या घटनेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

नथू दिनकर सुर्वे (वय-५८, रा. पापळवस्ती, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याबाबत सुर्वे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रतीक सुभाष बिबवे (वय-२५, रा. गणात्रा कॉम्प्लेक्स, बिबवेवाडी-मार्केट यार्ड रस्ता), क्षितीज विनायक जैनक (वय-२१, रा. नवी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नथू सुर्वे हे रम्यनगरी सोसायटीत सुरक्षारक्षक आहेत. सुर्वे हे रात्री सोसायटीच्या परिसरात असलेल्या दुकानाबाहेर झोपतात. काही दिवसांपुर्वी प्रतीक आणि क्षितीज रम्यनगरी सोसायटीत राहत असलेल्या मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. तसेच दोघे जण गोंधळ घालत होते. त्यावेळी सुर्वे यांनी दोघांना हटकले होते. सोसायटीमध्ये गोंधळ घालू नका, असे सुर्वे यांनी त्यांना सांगितले.

यानंतर दोघेजण सुर्वे यांच्यावर चिडले होते. मंगळवारी (दि. ०६) रात्री सुर्वे सोसायटीच्या आवारातील सराफी पेढी समोर झोपले होते. त्यावेळी झोपेत असताना सुर्वे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले. या घटनेत सुर्वे यांचा हात फॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments