Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजसोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुज माकीन (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी तनुज यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी तनुजची मैत्री झाली. तनुजने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून हडपसर परिसरातील फ्लॅटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. तसेच तिला धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यामुळे या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments