Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज सोशल मीडियाच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कारः तरुणीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांसह आरोपीच्या कुटुंबीयांवर...

सोशल मीडियाच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कारः तरुणीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांसह आरोपीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरात शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या 22 वर्षीय तरुणीची सोशल मीडिया इंस्टाग्राम वरून तरुणाकडून ओळख निर्माण करण्यात आली. त्यानंतर निरंजन बाजीराव घुले या तरुणाने तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवले.

तरुणी आंघोळ करत असताना लपून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपीने तरुणी सोबत वारंवार शरीर संबंध केले. या संबंधातून तरुणी गरोदर राहिल्याने तरुणीचा बेकायदेशीर गर्भपात डॉक्टरांकडून केल्याने पोलिसांनी आरोपी तरुणाच्या नातेवाईकांसह डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार मार्च २०२२ ते आत्तापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे आई-वडील यांनी तरुणीला गर्भपात कर नाहीतर, तुला मारून उजनीच्या धरणात फेकून देऊ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे तरुणीला माहेर हॉस्पिटल, उरळीकांचन येथे नेऊन तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी तरुणीने आरोपीं विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . त्यानुसार आरोपी निरंजन बाजीराव घुले, त्याचे वडील बाजीराव घुले, त्याची आई, त्याचे दाजी मल्हार कुंजीर, त्याचा मित्र समीर चौधरी, डॉ. टी वाय मोटे व डॉक्टर राजेश्री मोटे व अनोळखी दोन व्यक्ती यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे पुढील तपास करत आहे.

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एकाच ठिकाणी काम करत असलेल्या एका 27 वर्षीय तरुणीला सहकारी तरुणानी सलगी निर्माण करत तिच्याशी ओळख वाढवली. तरुणीने तरुणाकडे दुर्लक्ष केले तरीही तो तिचा सातत्याने पाठलाग करून त्याने तरुणीचा नंबर मिळवला. त्यानंतर तरुणी सोबत व्हाट्सअपवर तो बोलू लागला आणि त्याने ‘तू मला खूप आवडते, मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे’ असे तरुणीला विश्वासात घेऊन सांगितले. त्यानंतर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यात आला. तरुणीने तरुणाकडे लग्न करण्यासाठी विचारणा केली असता, तरुणानी मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही अशी धमकी दिली व तिची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अमर शिवचरण जमादार (वय 28, राहणार -भोरी कवटे, तालुका -अक्कलकोट, जिल्हा सोलापूर) याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments