Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजसोलापूरमध्ये उष्णतेच्या झळा; पुण्यात 'कसे' असेल हवामान? जाणून घ्या आजचे ...

सोलापूरमध्ये उष्णतेच्या झळा; पुण्यात ‘कसे’ असेल हवामान? जाणून घ्या आजचे हवामान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सतत वाढ होताना दिसून येत आहे. सोलापूरमध्ये तापमान वाढलेले दिसत आहे. तसेच पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानाचा पारा चढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुण्यातील तापमान..

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज १० फेब्रुवारी पुण्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके असू शकते. साधारणतः पुण्यात

सातारा-सांगलीत ‘कसे’ असेल हवामान ?

दुसरीकडे आज १० फेब्रुवारीला साताऱ्यातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. आज साताऱ्यात निरभ्र आकाश असेल. साताऱ्यातील तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर आज सांगलीमधील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. निरभ्र आकाश असेल. सकाळी हवेत थोडा गर्व जाणवेल. इतर शहरांप्रमानेच येथेही तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.

आज १० फेब्रुवारीला सोलापूरमध्ये आकाश निरभ्र असेल. सोलापूरमधील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके असु शकते. सोलापूरमधील किमान तापमानात वाढ झालेली बघायला मिळत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांतील तापमानात काहीशी घट झालेली असेल. तर कोल्हापूर शहरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारीला कोल्हापूरमध्ये निरभ्र आकाश असणार आहे. तसेच येथील तापमानात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे.

हवामान विभागानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता काही प्रमुख शहरांमधील तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील सर्वच भागात थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढ झालेली दिसून येईल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पॅरा चढलेला दिसून येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments