Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजसोरतापवाडीत फोनच्या वादातून पतीने केली पत्नीला टिकावाच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण..

सोरतापवाडीत फोनच्या वादातून पतीने केली पत्नीला टिकावाच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : मोबाईलवर आलेला फोन उचलल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला टिकवाच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लाड वस्ती परिसरात शनिवारी (ता. १८) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुक्ताराम वशिष्ट जावळे (वय ३३, रा. माउली लाड यांचे भाड्याचे खोलीत, लाड वस्ती सोरतापवाडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पती मुक्ताराम जावळे यांच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता. यावेळी पत्नीने फोन उचलला. तू फोन का उचलला म्हणून मुलगा रितेश याला शिवीगाळ, दमदाटी केली व फिर्यादी यांना घरातील टिकावाचे लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांच्या डावे हाताचे पंजावर मारुन हाड फ्रैक्चर केले आहे. याप्रकरणी आरोपी पती मुक्ताराम जावळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments