इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन : घराशेजारी सायकल खेळतअसलेल्या एका अल्पवयीन मुलीचा हात धरून 20 वर्षीय तरुणाने तीच्या तोंडावर पावडर टाकून बळजबरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साहिल सय्यद (रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर बालैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा बीएनएस ७४,७८, १२६(२), ३५१ (२) ३५१(३) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही घराशेजारी सायकल खेळत होती. यावेळी घराच्या पाठीमागून जाणाऱ्या रस्त्यावरून एक 20 वर्षीय तरुण दुचाकीवर निघाला होता. नराधम जवळ आला व त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. तिला काही समजायच्या अगोदरच तिच्या तोंडावर पावडर फेकली. व मंत्र पुटपुटला असे पालकांना सांगीतले. व त्याच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी देऊन बळजबरी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, मुलगी घरी परतल्यानंतर मुलीने वडीलांना घडलेला प्रकार सांगितला व सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उप निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.