Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजसोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदतवाढ नाही, पणन विभागाचे स्पष्टीकरण

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदतवाढ नाही, पणन विभागाचे स्पष्टीकरण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई: महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.

काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी सोमवारी (दि. १०) देण्यात आली आहे. तथापि, ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नाही. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments