Saturday, December 9, 2023
Home क्राईम न्यूज सोन्याच्या नावाखाली टेकवत तर नाही ना 'पितळ', रहा सावध, होऊ नका सावज

सोन्याच्या नावाखाली टेकवत तर नाही ना ‘पितळ’, रहा सावध, होऊ नका सावज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : धनत्रयोदशी निमित्ताने सोने खरेदीसाठी सराफा बाजार आता फुलले आहेत. अनेक जण या काळात सोन्यातील गुंतवणूक शुभ मानतात. कोणी दागिन्यांची खरेदी करतो, तर कोणी सोन्याचे बिस्किट, पत्रा याची खरेदी करतो. काही • डिजिटल गोल्ड हा गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. पण सराफा बाजारात सोने खरेदी करताना सजग राहणे गरजेचे आहे. नाहीतर सोन्याऐवजी पितळ हातात येईल. सोने खरेदी करताना तुमची फसवणूक तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. सोने हा मौल्यवान धातू आहे. त्यासाठी अधिक दाम मोजावे लागतात. सोने खरेदी करताना फसवणूक होऊ शकते. काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास ही फसवणूक टाळता येते.

हॉलमार्क तपासा

हॉलमार्क चाचणी ही सोन्याची शुद्धता तपासण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. ISO (Indian Standard Organization) त्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. सोन्याची शुद्धता हॉलमार्कच्या चिन्हावरुन स्पष्ट होते. हॉलमार्क शुद्ध सोन्याची हमी देतो. भारतीय मानक ब्यूरो (BIS) द्वारे प्रमाणित शुद्ध सोन्याची ही हमी असते. दागिने तयार करणारे, घडविणारे त्यावर हॉलमार्क लावतात…

BIS care app

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care App डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस अॅप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

विश्वासू सराफाकडून करा खरेदी

दागिने खरेदी करताना, तुमच्या विश्वासातील सराफाकडून ते खरेदी करा. नेहमीच्या दुकानदाराकडूनही सोन्याची पारख करुन घ्या. त्यासाठी BIS Care App चा वापर करता येईल. ओळखीच्या सराफामुळे फसवणूकीची शक्यता कमी असते. तरीही सोन्याची शुद्धता तपासणे आवश्यक आहे. डोळे झाकून सोन्याची खरेदी करु नका.

मेकिंग चार्जेस अगोदरच विचारा

सोने खरेदी करताना, दागिने तयार करण्यासाठी मेकिंग चार्जेस लावण्यात येतात. प्रत्येक ज्वेलर्सकडे हे शुल्क वेगवेगळे असते. मेकिंग चार्जेसबद्दल अगोदर विचारा. खरेदीनंतर बिल घ्या. बिलामुळे दागिन्यांचे वजन, त्याची शुद्धता आणि मेकिंग चार्जेसची माहिती मिळते. तसेच पुढील वेळी हे बिल उपयोगी पडते.

अशी तपासा शुद्धता

• हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.

• त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या

• सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल

• हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे.

• 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते. • 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते

• 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते

• 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments