इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोने चांदीच्या किंमती चांगल्याच भडकल्या आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांची चांगली झोप उडाली आहे. सर्व कॅरेटच्या सोन्याच्या किमती सुसाट झाल्या आहेत. येत्या चार दिवसात सोने 2000 रुपयांनी वधारले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दराचा पुन्हा भडका उडणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. गुरूवारी 400 रुपयांनी दर वधारले.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येत असतात. जागतिक बाजारात चांदीच्या दरात चढ-उतार होत असून 5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी हजाराची वाढ चांदीने नोंदवली होती. तेव्हापासून चांदीत दराच्या किमती कमी झाल्या आहेत.. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,400 रुपये इतका आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा आहे. एक किलो चांदीचा भाव 97,789 रुपये इतका झाला. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने गभावात अधिक तफावत दिसून येते. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. दरम्यान सोन्याच्या वाढत्या किमतीला कधी ब्रेक लागणार याची चिंता आता ग्राहकांमध्ये आहे.