इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपी कामगाराला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ३४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय पीडित महिला मनोरुग्ण आहे. आरोपी तरुणाला सुश्रूषेसाठी ठेवण्यात आले होते. मनोरुग्ण महिलेला धमकावून त्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. ३ जानेवारी पासून आठ दहा दिवस तो पीडित महिलेवर तिला धमकावून अनेक वेळा बलात्कार केला. महिला मनोरुग्ण असल्यामुळे सुरुवातीला तिने या घटने बदल कोणालाही सांगितले नाही. नंतर मात्र तिने माहिती दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध फिर्याद देण्यात आली. फिर्यादीनुसार आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते हे घटनास्थळी पोहचले. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.