इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी-चिंचवडः पिंपरी-चिंचवड येथून संतापजनक प्रकार समोरआला आहे. येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने 13 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांनी पकडून मारहाण करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना बोपखेले येथे रविवारी (13 एप्रिल) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लाला मोहम्मद शेख (65, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (14 एप्रिल) रोजी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाला शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार आहे. तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहतो. तर त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात. आरोपी लाला शेख हा त्याच्या घरातील खोलीत एका 13 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यानंतर नागरिकांनी लाला शेख याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या मारहाणीत शेख जखमी झाला. त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.