Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूज'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाची आत्महत्या; खंडणीसाठी आरोपी करत होते ब्लॅकमेल

‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाची आत्महत्या; खंडणीसाठी आरोपी करत होते ब्लॅकमेल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकलेल्या एका तरुणाने बदनामी होईल, या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिघी परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. त्यानुसार सूरजकुमार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यासह सहा मोबाईलधारकांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या भावाला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्यांचा फोटो अश्लील पद्धतीने ‘मॉर्फ’ केला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 51 लाख रुपयांची मागणी केली. बदनामी होऊ नये, यासाठी फिर्यादी यांच्या भावाने आरोपींना दहा हजार रुपये ऑनलाइन पाठवले; मात्र त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला वारंवार फोन करून पैशांची मागणी करत मानसिक त्रास दिला.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तसेच बदनामीच्या भीतीने फिर्यादी यांच्या भावाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. तपास दिघी पोलीस करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments